Watch गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला वेश्येकडे का पाठवलं? Sadhguru Marathi in New Channel | Channify

c-3OFRupVBQEKlvGo0 4400038 Iq-JQDWVItw
Views 162,415
Likes 1,665
Comments 49
Published Dec 15, 2018
Channel Sadhguru Marathi

Add More Videos To your Channel

गौतम बुद्ध आपल्या मोठ्या शिष्यांसोबत सतत फिरतीवर असत. म्हणून त्यांनी एक नियम घालून दिला की पावसाळ्याचे, अडिच महिने त्यांनी एकाच ठिकाणी राहावं. इतर वेळी संन्याशी आणी भिक्षूंसाठी नियम होता, की त्यांनी दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस एकाच ठिकाणी राहू नये. साधारणत: भिक्षूंना अनेक घरांमध्ये आसरा दिला जायचा, म्हणुन त्यांनी हा नियम घालून दिला की त्यांनी दोन रात्रींपेक्षा जास्त एकाच घरात राहू नये. नाहितर त्या घरमालकावर जास्त ओझं होईल. दहा जणांना ते आसरा देताहेत, तुम्ही तिथं महिनाभर थांबू नये. फक्त दोन दिवस. खरतर एकच दिवस असायला हवा, पण दोन दिवस ठीके कारण इतकं लांब चालत आला आहात, थोडी विश्रांती मिळायला हवी. पण पावसाळ्यात ते म्हणाले, की दोन ते अडीच महिने, तुम्ही एकाच ठिकाणी राहू शकता. कारण, त्या प्रदेशात जंगलामार्गे प्रवास करणं, पावसाळ्य़ाच्या दिवसांत कठीण जाऊ शकतं. आणि कित्येकांचा जीवही जाऊ शकतो. म्हणून अशा वेळी, ते एका मोठ्या शहरात थांबत असत. आणी तिथल्या अनेक घरांमध्ये सर्वांच्या सोय केली जात असे. ........................ ............जर तुम्हाला पर्याय दिला, कोणत्याही व्यक्तीला, जर पर्याय निवडायला दिला, इथं रहायचंय का तिथं, तर ते नेहमीच म्हणतील, मला तिथं राहायचंय. आत्ता भले ते इथं अडकले असतील, पण इच्छा नेहमी सर्वोच्च ठिकाणी पोहचण्याचीच असते. फक्त इतकच की, आपल्याला त्यांना दाखवायला हवं, की दारूपेक्षाही उच्चकोटीची नशा उपलब्धये. ड्रग्स पेक्षाही अधिक प्रभावी नशा आहे. आयुष्यात वेगवेगळी सोंगं करण्यापेक्षा अधिक उत्तम गोष्टी आहेत. इतरांपेक्षा वरचढ होण्यापेक्षा अधिक प्रभावी गोष्टी आहेत. आपल्याला फक्त हे त्यांना दाखवून द्यायची गरज आहे, त्यांना हे समजावण्याची गरज आहे की तल्लीन होण्याची उत्तम साधनं आहेत.